...अन्‌ बिबट्याने ठोकली जंगलात धूम! 

Leopard caught in a trap at Ghagrewadi released into its natural habitat
Leopard caught in a trap at Ghagrewadi released into its natural habitat
Updated on

शिराळा (जि. सांगली ) : घागरेवाडी (ता. शिराळा) येथे वन विभागाने सापळा लावून जेरबंद केलेल्या बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर सापळ्यात बंदिस्त असणाऱ्या बिबट्याने जंगलात धूम ठोकली. 

गुरुवारी रात्री एक ते सव्वा वर्षाच्या बिबट्याच्या मादीस वन विभागाने सापळा लावून पकडून शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली. ती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक पी. बी. धानके, सहायक वनसंरक्षक जी. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, अमोल साठे, बाबा गायकवाड, संपत देसाई यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. 

गुरुवारी (ता. 18) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घागरेवाडी परिसरात आलेला बिबट्या कुत्री पाठीमागे लागल्याने गल्लीत घुसला होता. त्याला पाहताच गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये तो घुसला. त्यावेळी दिलीप यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याची चौकट कॉट लावून बंद केली. याबाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल रविकांत भगत, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, पी. एन. पाटील, देवकी ताशीलदार, रेहना पाटोळे, अमोल साठे, उस्मान मुल्ला, प्रकाश पाटील, वनकर्मचारी संपत देसाई, शहाजी पाटील, आदिक शेटके, अनिल पाटील, दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील, पोलिस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी रात्री साडेबारा वाजता बिबट्याला सापळ्यात जेरबंद केले. यावेळी सरपंच उषाताई घागरे, पोलिसपाटील मोहन घागरे, मारुती घागरे, रोहित घागरे, आनंदा घागरे, जयवंत चौगुले, बाजीराव चौगुले, बजरंग चौगुले, संजय चौगुले व तरुणांनी विशेष सहकार्य केले. 

या बिबट्यास शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून शुक्रवारी सकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ. विशाल गावडे यांच्यामार्फत तपासणी केली. त्याची प्रकृती सुस्थितीत होती. वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीनंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com