
एरंडोली : येथील जिल्हा परिषद मुला-मुलींच्या दोन्ही शाळा स्मार्ट, डिजीटल झाल्या आहेत. इथली मुलं आता केवळ फळा, खडूने शिकणार नाहीत तर टीव्ही, संगणक आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून धडे गिरवणार आहेत. शासन निधीबरोबरच ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचे रुपडे पालटले आहे.
गावाचे ग्रामस्थ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले या शाळेचे माजी विद्यार्थी दीपक पाटील यांनी सात स्मार्ट टीव्ही भेट दिल्यामुळे ही शाळा आता शंभर टक्के डिजीटल झाली आहे. चौदाव्या वित्त आयोगातील निधीने शाळेचे रुपडे पालटले असून जिल्हा नियोजन समितीतून मुलींच्या शाळा बांधकामासाठी 28 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या शाळेसाठी संजय पाटील यांच्या खासदार निधीतून दोन संगणक, जि.प. सदस्य शरद लाड यांच्या निधीतून एक प्रोजक्टर, शिवाय वर्ल्ड व्हिजनच्या मदतीने मिळालेल्या संगणकांमुळे डिजीटल उपक्रम सुरु होता. त्यात आता दिपक पाटील यांनी सात स्मार्ट, एलईडी टीव्ही भेट दिल्याने शाळा शंभर टक्के डिजीटल झाली. नुकतेच त्यांचे बंधू बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते शाळेला टीव्ही प्रदान करण्यात आल्या.
इंग्रजी माध्यम शाळांशी स्पर्धा आणि गुणवत्ता वाढीसाठी एरंडोलीच्या दोन्ही शाळा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातूनच येथे कराटे आणि ऍबॅकसचे धडे दिले जात आहेत. वर्ग तेथे ग्रंथालय उपक्रमालाही सुरवात करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून सुमारे पाच लाखांचा निधी दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. माजी जि.प. सदस्य प्रकाश कांबळे यांच्या निधीतून विचारमंच बांधण्यात आला आहे. ग्रंथालय बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जि.प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि सदस्या जयश्री पाटील यांनी मुलींच्या शाळा बांधकामासाठी प्रत्येकी सात लाखाप्रमाणे 28 लाखाचा निधी दिला आहे. त्याचे बांधकाम लवकर सुरु होणार आहे.
"माझी शाळा, मराठी शाळा', हे ब्रीद घेऊन येथे उपक्रम सुरु आहेत. शाळा समित्यांचे अध्यक्ष विजय पाटील आणि बाजीराव खटावे, मुख्याध्यापक रामगोंडा पाटील आणि सौ. मकानदार यांच्यासह टीमच्या प्रयत्नांमुळे ही शाळा उपक्रमशील म्हणून ओळखली जावू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.