कुटुंबाची काळजी घेऊया, कोरोनाविरूद्धची लढाई जिंकुया...

शांताराम पाटील
Tuesday, 29 September 2020

नको तुमचे दान, नको तुमचा पैसा, आमचं आता ऐका, कोरोनाला हरवुया, नियमाचं पालन करुया, स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया, सारे मिळुन ही लढाई जिंकुया, असे आवाहन करत कोरोनाच्या लढाईत निशिकांतदादा फौंडेशनतर्फे पथनाटय सादरीकरण सुरु आहे.

इस्लामपूर : नको तुमचे दान, नको तुमचा पैसा, आमचं आता ऐका, कोरोनाला हरवुया, नियमाचं पालन करुया, स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया, सारे मिळुन ही लढाई जिंकुया, असे आवाहन करत कोरोनाच्या लढाईत निशिकांतदादा फौंडेशनतर्फे पथनाटय सादरीकरण सुरु आहे. या जनजागृती मोहीमेला शहरासह ग्रामीण भागातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

कोरोनाचे संकट संपुर्ण सांगली जिल्ह्यावर आले असुन रुग्णांची वाढती संख्या ही जनतेच्या मनात भिती निर्माण करणारी आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यामध्ये या आजाराबाबत जनजागृती होऊन जनतेच्या मनातील भिती कमी व्हावी यासाठी उरूण- इस्लामपुर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांच्या कल्पनेतुन फौंडेशन च्या माध्यमातुन पथनाटय सादरीकरण सुरु आहे. याला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपुर, आष्टा शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील चौका चौकात पथनाटयव्दारे जनजागृती कार्यक्रम सुरु आहेत. 

यामध्ये सोशल डिस्टसींग पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, साबनाने सतत हात स्वच्छ करा, मास्क वापरा, कोरोनातुन अनेक रुग्ण बरे झाले आहेत, घाबरु नका, आरोग्य व प्रशासन विभागाच्या नियमाचे पालन करा, त्यांना सहकार्य करा आदी संदेश दिला जात आहे. यासाठी निशिकांत फौंडेशनचे पदाधिकारी अक्षय पाटील, प्रविण माने, विश्वजीत पाटील, सागर जाधव, रणधीर फार्णे, रवि चव्हाण, विशाल आडके, शोएब संदे यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's take care of the family, let's win battle against Corona ...