
सांगली : लेझीम या पारंपरिक प्रकारात विश्वविक्रमी कामगिरीनंतर सांगली शिक्षण संस्थेने प्रजासत्ताक दिनी आणखी एक इतिहास रचला. देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात ‘कर्तव्यपथा’वर संचलनाच्या सुरवातीला सांगलीच्या सुपुत्रांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतावर लेझीमचा ठेका धरत संचलन केले.