वाटेत सापडलेल्या कासवाच्या तोंडात अडकला होता गळ... वाचा मग काय झाले

Life given to the injured turtle at shirala
Life given to the injured turtle at shirala

शिराळा (जि. सांगली) : तोंडात गळ अडकून जखमी झालेल्या कासवावर शिराळ्याचे वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून त्यास नदीत सोडण्यात आले.

याबाबत समजलेली माहिती अशी, विकास कुलकर्णी हे इस्लामपूर आगारात वाहक आहेत. ते इस्लामपूर येथे रहातात. ते त्यांच्या गोटखिंडी येथे मूळगावी जात असताना त्यांना वाटेत कासव सापडले. मात्र त्याच्या तोंडात गळ होता. यांनी याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्या कासवाला इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर यांच्याकडे नेले. त्यांनी उपचार करून त्याच्या तोंडातील गळ काढला.

त्यानंतर त्यास दहा दिवस दत्त टेकडी येथे पाण्याच्या टाकीत त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. ते व्यवस्थित बरे झाल्यानंतर त्यास बावची बिटचे वनरक्षक अमोल साठे, वनमजूर निवास उगळे यांनी बहे नदीपात्रात सोडले.

"कोणाला जखमी वन्यजीव सापडल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्यावर तत्काळ उपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल', असे आवाहन यावेळी श्री. काळे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com