तीन वर्षे साठवले खाऊचे पैसे अन्‌ त्याचे केले असे काही... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

सानिया देवकुळे असं या मुलीचं नावं. तिने घेतलेल्या निर्णयाची माहिती खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या फेसबूक अकौंटवर शेअर केली आहे. सोबत एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. 

सांगली ः तीने एक भिशी विकत घेतली. तीन वर्षांपूर्वी. त्यात तिने खाऊसाठी मिळालेला एकेक रुपया साठवला. तब्बल तीन वर्षे ती या भिशीत पैसे टाकत राहिली. भिशी जवळपास भरत आली होती. अर्थातच त्यात किती रक्कम असेल याची तिलाही अंदाज नव्हता. तिने ते पाहिलेही नाही. ती भिशी अशीच उचलली आणि एक भन्नाट निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने देशावर कितीही संकट आले तरी युवा पिढी देशासाठी उभी रहायला तयार असते, असाच संदेश दिला गेला.

सानिया देवकुळे असं या मुलीचं नावं. तिने घेतलेल्या निर्णयाची माहिती खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या फेसबूक अकौंटवर शेअर केली आहे. सोबत एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. 

सानियाने नेमके केले काय? तर सानियाने आपली भिशी उचलली आणि आपल्या भागात दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री जयंत पाटील यांना ती भेटली. ती भिशी आहे तशी तिने जयंतरावांच्या हातात दिली आणि सांगितले कोरोना विरोधात जी महाराष्ट्रात लढाई सुरु आहे, त्यासाठी हा माझा खारीचा वाटा घ्या, अशी विनंती केली. जयंतरावांना त्या पोरीचं भारी कौतुक वाटलं.

त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. जयंतरावांनी तिच्याविषयी पोस्ट लिहताना म्हटले आहे, की आटपाडी तालुक्‍यातील सानिया देवकुळे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गेल्या तीन वर्षांपासून साठवलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक आदर्श उभा केला आहे. इतक्‍या लहान वयात उपजय असलेली ही सामाजिक जाणीव पाहून अभिमान वाटला. या मुलांसाठी आपल्याला आशादायी भविष्य निर्माण करायचं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little girl give money to jayant patil for CM found