सांगलीत गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त

Live cartridges along with village pistol seized in Sangli
Live cartridges along with village pistol seized in Sangli

सांगली : एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे येथील मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आलेल्या एकाकडून जप्त करण्यात आली. स्वप्निल वसंत जाधव (वय 24, रा. तिसंगी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपयाचे पिस्तूल, चारशे रुपयांची दोन काडतुसे आणि रोख 200 रुपये, असा 60 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पथक तयार करून ते ठिकठिकाणी तपासणी करीत आहेत. या पथकातील वैभव पाटील आणि चेतन महाजन यांना येथील मार्केट यार्डमधील वैरण बाजारजवळ एकजण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार आज सकाळी त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी संशयास्पदरीत्या थांबलेल्या जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली. हे पिस्तूल विक्रीसाठी आणले असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून, पुढील तपास करण्यासाठी जाधव याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

"मेड इन यूएसए' 
पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल हे लोखंडी असून गावठी बनावटीचे आहे. ते परदेशी बनावटीचे वाटावे. त्याला चांगली किंमत मिळावी, यासाठी त्यावर मेड इन यूएसए असा शिक्का मारण्यात आला आहे. गावठी पिस्तूल तयार करण्याचे अनेक बेकायदा कारखाने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणचे हे पिस्तूल असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com