
सांगली : कोरोना'च्या आपत्तीत सर्वत्र टाळे लागली तरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात तीन लाख 29 हजार 801 ग्राहकांना घरपोहच सिलिंडर पोहच झाली. विविध कंपन्यांच्या एजन्सी कर्मचाऱ्यांनी अविरत ही सेवा सुरु ठेवून केलेली सेवा कौतुकास्पद आहे. या सर्व आपत्तीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याच्या अनेक तक्रारी आल्या मात्र गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांबाबत मात्र असे झाले नाही.
गॅस कनेक्शनला आधार लिंक झाल्यापासून आणि अनुदान थेट खात्यावर वर्ग झाल्यापासून सिलिंडर वाटपातील गैरव्यवहाराला पुरता चाप लागला. सिलिंडरचा तुटवडाही संपला. नियमातील तरतुदींप्रमाणे सिलिंडर घरपोहच सुरु झाली. सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या काळातही ही सेवा अखंड सुरु असून सर्वत्र संचारबंदी असतानाही या कर्मचाऱ्यांनी घराघरात सुरक्षितता पाळत सेवा दिली. याबाबत गोंधळाची कोणतीही तक्रार पुढे आली नाही. विशेष म्हणजे या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाच लाख रुपयांचा विमा सबंधित कंपन्यांनी उतरवला आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या योगदानाची कंपन्यांनी योग्य दखल घेतली आहे.
जिल्ह्यात एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपन्यांच्या 77 एजन्सी आहेत. गॅस सिलिंडर वेळेत न मिळाल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून नाही. एजन्सीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वाहने यांच्याबाबतीत सर्वच एजन्सीज यांनी काळजी घेतली आहे. ऑनलाईन गॅस नोंदणी आणि वितरण व्यवस्थेमुळे चार वर्षात गॅसची सेवा अतिशय चांगली राहिली आहे. लॉकडाऊन काळात नोंदणी करुन सिलिंडर वेळेत न मिळाल्याची एकाही ग्राहकाची तक्रार नाही. अनेकांनी भीतीपोटी नोंदणी केली. सिलिंडर घरात आले. मात्र रिकामे सिलिंडर नसल्याने एजन्सीवर सिलेंडर परत नेण्याची वेळ आली. काही गरीबांकडे पैसे नसल्यानेही सिलिंडर न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उज्वला योजनेंअंतर्गत नोंदणी असलेल्या जोडण्यांना तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आधी ग्राहकांना ती रोखीतच घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ती रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे.
सांगली जिल्ह्यात कंपनी निहाय ग्राहक, कंसात एजन्सींची संख्या ः एचपीसीएल (42)- 343359, बीपीसीएल (22)- 229968, आयओसीएल (13)- 109392, एकूण ग्राहक संख्या- 77, 682719
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.