लॉक डाऊन वन्यप्राण्यांच्या पथ्यावर

Lock down on the path of the wildlife
Lock down on the path of the wildlife
Updated on

बेळगाव ः लॉक डाऊनमुळे सध्या रस्त्यावरील लोकांची वर्दळ थंडावली आहे. वाहनांचा कर्णकर्कश आवाज कमी होण्यासह प्रदूषणातही घट झाली आहे. त्याशिवाय वन्यप्राण्यांच्या संचारातील अडथळा दूर झाल असून ते आता मुक्‍तपणे फिरु लागले आहेत. त्यामुळे, हिरवाईने नटलेल्या शहर परिसरात काही ठिकाणी मोरांचे दर्शन घडू लागले आहे. त्याशिवाय पक्षांचा किलबिलाटही वाढला आहे. 

हिंडलग्याजवळील अरगन तलाव, निसर्ग कॉलनी, व्हॅक्‍सिन डेपो, कॅम्प, शिंदोळी क्रॉस, बसवण कुडचीचा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शिवारात सध्या मोरांचे कळप फिरत असून येथून ये-जा करणाऱ्यांना त्यांचे दर्शन होत आहे. गणेशपूरजवळील निसर्ग कॉलनीत तर घरासमोर मोर बागडू लागले असून कॉलनीतील आबालवृद्धांना एक सुखद अनुभव मिळत आहे. शहरी भागात घरांसमोर फिरणाऱ्या मोरांचे सध्या अनेकांनी आपल्या मोबाईलवर दृश्‍य टिपण्यास सुरवात केली असून असे फोटो आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याने आता रस्त्यावरच पशू पक्ष्यांनी निर्धास्त ठाण मांडल्याचे दिसून येत आहे. 

शहरात आधीच भटक्‍या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वर्दळीमुळे कुत्री कधीच रस्त्यावर येत नव्हती. रस्त्याकडेला असलेले पदपथ त्यांचे वास्तव्याचे ठिकाणी होते. पण, सध्या कोर्ट रोड, काकतीवेचा मुख्य रस्ता, तसेच शहरातील इतर वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची घरघर कमी झाल्याने कुत्री रस्त्यावरच बसून राहात आहेत. माणसांसाठी असणारी ही संचारबंदी प्राण्यांसाठी मात्र खुल्या मैदानात परावर्तीत झाली आहे. खानापूर, दांडेलीत रस्त्यावर हत्ती, हरणे आदी प्राणी फिरत असल्याने अनेकांना दिसून आले आहे. सध्या निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी प्राण्यांचा वावर वाढत असल्याचेच हे चित्र असून पर्यावरणीय प्रदूषण लॉक डाऊनमुळे कमी झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com