लॉकडाऊनमुळे मुले स्मार्टफोन टिव्हीलाही वैतागली; मुलांचा आता याकडे ओढा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

घरी बसून तरी करायचं काय कितीवेळ घरी बसायचं शरीराला कोणत्याच हालचाल नाही. मग लहान मुलांनी जुना खेळ खेळण्यास सुरुवात केली.

झरे (जि. सांगली) : ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये लहान बालके पारंपारिक खेळ जपताना दिसताहेत, जगामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आले, पूर्वी घरोघरी रेडिओ दिसत होता. त्यानंतर टीव्हीचा जमाना आला, आता प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसत आहे, म्हणजे अलीकडच्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊन जगातील माहिती एका क्‍लिकवर मिळू लागली आहे. त्यामुळे पारंपारिक खेळाकडे तरुणांचे लक्ष कमी झाल्याचे दिसून येत आहे. अशा काळातच पूर्वीचा पारंपारिक खेळ खेळणं म्हणजे एक कौतुकाचा भागच आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व लॉक डाऊन असल्याने शाळा बंदच आहेत, घरी बसून तरी करायचं काय कितीवेळ घरी बसायचं शरीराला कोणत्याच हालचाल नाही. मग लहान मुलांनी जुना खेळ खेळण्यास सुरुवात केली. पारंपारिक खेळांमध्ये लंगडी, शिवपाट, गदगळी खेळणे, विटी दांडू,सूर पारंब्या, सुरफाटी असे जुने पारंपारिक अनेक खेळ आहेत, त्यापैकी रिंगण करून काची गोट्या खेळणे हा पारंपरिक खेळ मुलांनी खेळण्यास सुरुवात केली. 

अशा प्रकारचे जुने खेळ सध्या कुठेही खेळताना बघायला मिळत नाहीत. परंतु विभुतवाडी ता. आटपाडी येथील लहान मुलांनी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गोटया खेळण्याचा खेळ थाटला व अनेक जण नागरिक खेळ बघण्यासाठी आपुलकीने उभा राहिले होते. कारण हा खेळ नागरिकांनी लहानपणी खेळलेला आहे. लॉकडाऊन मुळे घरी बसून कंटाळा आला असल्याने बालक वैतागून गेला आहे. त्याला शरीराची हालचाल होणे हे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गोट्या खेळण्याचा खेळ मांडला होता. 

पारंपारिक खेळ 
गदगाई, काची व हाडकी गोट्या, विटी दांडू, सूर पारंब्या, सुरुफाटी, लबरी चाके फिरविणे, हुतुतू, शिवणापाट, हबाधबी, सळी फेक, गलोर, लगोर लपाछपी व अन्य पारंपरिक खेळ खेळत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lockdown also annoyed children with smartphone & TV