esakal | ब्रेकिंग : 'सांगली जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन'

बोलून बातमी शोधा

null

ब्रेकिंग : 'सांगली जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन'

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल (सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज जिल्ह्यात आठ दिवसाच्या टाळेबंदी (Lockdown) जाहीर केली आहे. जिल्ह्यातील (Sangli District) परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी आता उपाय असल्याने प्रशासनाशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उद्या ५ मे मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू होईल. (Lockdown declaire in Sangli)

जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनची टंचाई आहे. (Oxygen)औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी (Citizen) टाळेबंदीला सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (Appeal) ते संदेशात (Message) म्हणतात, 'तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर (Corona) मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा.'

हेही वाचा: Gokul Election: उत्कंठा वाढवणाऱ्या लढतीत शौमिका महाडिकांची बाजी तर विरोधी गटातून रेडेकर विजयी

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. जत,(Jat) आटपाडी,(Aatpadi) कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी दिले आहेत.