esakal | मालवाहतूकीचा झाला  "चक्काजाम' 
sakal

बोलून बातमी शोधा

 Lockdown has begun in markets across the country

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये "लॉक डाऊन' सुरु झाले आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा हळूहळू बंद होत आहेत. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यासह राज्य आणि देशातील मालवाहतूक जवळपास ठप्प व्हायला आली आहे.

मालवाहतूकीचा झाला  "चक्काजाम' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये "लॉक डाऊन' सुरु झाले आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा हळूहळू बंद होत आहेत. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यासह राज्य आणि देशातील मालवाहतूक जवळपास ठप्प व्हायला आली आहे. या घडीला पन्नास टक्के वाहतूक थांबली असून चक्काजाम झाला आहे. सांगलीतून साखर वगळता अन्य शेतमाल, प्रक्रिया माल आणि औद्योगिक सुटे साहित्य वाहतूक थांबली आहे.

जिल्ह्यात देशांतर्गत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूणच व्यापारी वाहनांची संख्या दहा हजारावर आहे. स्थानिक वाहतूकीवर अद्याप फार मोठा परिणाम झालेला नाही, मात्र पुढील दोन दिवसांत बाजारपेठांमधील स्थिती पाहून ही वाहने जाग्यावर थांबतील, अशी वेळ आली आहे. या पेठांतून जिल्ह्यातील किरकोळ व्यापाऱ्यांकडे होणारी मालवाहतूक आता थंडावू लागली आहे. पण, सर्वात मोठा परिणाम देशांतर्गत वाहतुकीवर झाला आहे.

सांगलीतून देशभर, जसे दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आदी राज्यात होणारी मालवाहतूक ठप्प झाली आहे. सांगलीतून विशेषतः साखर, गूळ, पेंड, हळद पावडर आणि बेदाणा या मालाची मोठी वाहतूक होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव बाजार समितीसह पंढरपुरातीलही बेदाणा सौदे आता बंद झाले आहेत. हळद सौदे आधीच बंद केले आहेत. पुढील काही दिवस मार्केट यार्डमध्येही "लॉक डाऊन' होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक पूर्णपणे कोलमडणार आहे. 

सांगलीतून हे ठप्प 

  • बेदाणा ः सौदे बंद झाल्याने वाहतूक थांबली 
  • हळद ः उतारपेठेत आवक थांबली, सौदेही बंद 
  • वाहन उद्योगासाठीचे सुटे पार्ट मंदीमुळे आधीपासूनच ठप्प 
  • फक्त साखर वाहतूक 

आकड्यांत स्थिती

  • वाहनांची संख्या ः सुमारे 10 हजार 
  • देशव्यापा धावणारी वाहने ः 3 हजारावर 
  • अवलंबित लोकसंख्या ः सुमारे 30 हजारावर 
  • बंद असलेली वाहने ः 5 हजारावर 

पन्नास टक्के वाहतूक व्यवस्था ठप्प

वाहतूक व्यवस्थेशी निगडीत प्रत्येक घटकाची आम्ही काळजी घेत आहोत. देशात सर्वाधिक क्षेत्र व्यापलेला आमचा व्यवसाय आहे. त्यावर परिणाम सहाजिक आहे. या घडीला पन्नास टक्के वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. त्यात आणखी वाढ होईल.

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन