सांगलीतील बाजार समितीतील सौदे पुन्हा लॉकडाउन 

अभिजीत डाके 
Tuesday, 21 July 2020

परंतू धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी कोणत्या पध्दतीच्या नियमावली तयार केल्या जाणार आहेत, त्या नियमावली आल्यानंतर धान्य बाजार सुरु ठेवणार की बंद ठेवणार याबाबतचा निर्णय लवकरच घेवू अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. 

सांगली ः जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. 22) रात्री पासून पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सौदे देखील गुरुवारी (ता.23) ते गुरुवार (ता.30) या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीच्या प्रशासनाने घेतला आहे. परंतू धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी कोणत्या पध्दतीच्या नियमावली तयार केल्या जाणार आहेत, त्या नियमावली आल्यानंतर धान्य बाजार सुरु ठेवणार की बंद ठेवणार याबाबतचा निर्णय लवकरच घेवू अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोमवारी (ता. 20) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बुधवारी (ता. 22) ते गुरुवारी (ता. 30) पर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या क्षेत्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तासगाव आणि सांगली येथील बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय शीतगृह असोशिएशन आणि बेदाणा अशोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांचा बेदाणा तासगाव, कुपवाड येथील शीतगृहात आहे. शीतगृहे व सौद्यात होणारी शेतकरी, व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेवून हा निर्यण घेतला आहे. 

गेल्या आठवड्यात सांगली बाजार समितीने चार दिवस सौदे बंद ठेवले होते. त्यानंतर बाजार समितीत सौदे सुरु झाले.दरम्यान, सांगली येथील बाजार समितीतील सौदे बंद केले जाणार आहेत. त्यातही धान्य बाजार सुरु बंद ठेवले जाणार आहेत. परंतू धान्य बाजार सुरु ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली तयार केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले आहे. ही नवीन नियमावली आल्यानंतरच धान्य बाजार सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत नवीन नियमावली आल्यानंतर त्याबाबात निर्णय घेण्यात येईल. 
- दिनकर पाटील, 
सभापती, सांगली बाजार समिती, सांगली 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Locksdown in Sangli Market Committee again