Loksabha 2019 : अमित शहा म्हणाले लोकांना उन्हात का बसवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

सांगली - भाजपध्यक्ष अमित शहा आज तासगाव येथे लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आले आहेत. येथे आल्यानंतर लोक उन्हात बसले आहेत. हे पाहून अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली व मांडव का उभारला नाही. लोकांना उन्हात का बसवले आहे? असा प्रश्न खासदार संजय पाटील यांना केला. 

सांगलीत सध्या 38 अंश तापमान आहे. उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. त्यातच दुपारी 12 च्या सुमारास ही सभा घेतल्याने मांडव घालने ही जबाबदारी संजय पाटील यांची होती. पण उमेदवारीचा खर्च अधिक झाल्याने श्री. पाटील यांनी खर्च करण्यासाठी मांडव उभारला नाही, असे सांगितले. खर्चाची मर्यादा 70 लाख असल्याने ती राखणे गरजेचे आहे. त्यामुळेच खर्च कमी करण्याचा प्रयत्न श्री. पाटील करत आहेत. 

दरम्यान भाजपचे उमेदवार खासदार पाटील यांनी ४२  लाख २४ हजार ७९७ रुपये खर्च झाल्याची माहिती सादर केली आहे. निवडणूक खर्चाच्या नोंदवह्या आणि मूळ प्रमाणके यांची तपासणी केली असता खर्चाच्या नोंदी आणि कार्यालयाकडील निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाच्या निरीक्षण नोंदवहीनुसार ५९ लाख ५८ हजार ७६३ रुपये खर्च दिसतो. १७ लाख ३३ हजार रुपयांची तफावत असल्याचे दिसून आले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Amit Shah comment in Tasgaon