esakal | Loksabha 2019 : ...मग वसंतदादांचा पुतळा भाजपने झाकून का ठेवला? - अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : ...मग वसंतदादांचा पुतळा भाजपने झाकून का ठेवला? - अशोक चव्हाण

सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

Loksabha 2019 : ...मग वसंतदादांचा पुतळा भाजपने झाकून का ठेवला? - अशोक चव्हाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सांगतेनिमित्त सभेत ते बोलत होते. 

स्टेशन चौकातील वसंतदादांचा पुतळा झाकून मंडप घातला गेल्याकडे लक्ष वेधत श्री चव्हाण म्हणाले,"" राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासारख्या थोर पुरुषांची शताब्दी साजरी करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे. ते त्यांचे कर्तव्य आहे. मात्र ते त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडला नाही. आम्ही आमच्यापरीने त्यांची शताब्दी साजरी केली. ते दादांच्या नावाची सहानभूती घेणारी वक्तव्ये करतात. मग त्यांनी इथल्या स्टेशन चौकातील दादांचा पुतळा झाकून ठेवला. पण लक्षात ठेवा दादांची पुण्याई अद्याप संपलेली नाही. विशाल तुम्ही चिंता करण्याची गरज नाही.'' 

श्री. चव्हाण म्हणाले,""  भाजपने गेल्या निवडणुकीत शेतीमालाच्या दीडपट हमीभावाचे आश्‍वासन दिले. ते पाळले नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र ती अजूनही पुर्ण झालेली नाही. बोलाचीच कडी बोलाचाच भात. मुख्यमंत्री गेली दोन वर्षे झाले शेतकरी कर्जमाफीचा केवळ अभ्यास करताहेत. मुख्यमंत्री कर्जमाफीत नापास झाले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांची ते पाठराखण करीत आहेत.'' 

" दादांची जयंती साजरी करायची राहो. पण त्यांच्या पुतळा झाकून ठेवून प्रचार करायची वेळ विरोधकांवर आली आहे. ते दादांना एवढे ते घाबरत आहेत. याचा सांगली जिल्ह्यातील मतदार विचार करुन तुम्हाला धडा शिकवतील.'' 

- विशाल पाटील

दादा म्हणाले; "शरदच चांगला कारभार करेल !' 

वसंतदादा दृष्टे नेते होते. मोठ्या मनाचा माणूस. ज्यांचं सरकार आम्ही पाडलं. त्या शरद पवार यांनाच त्यांनी मुख्यमंत्री केलं. त्यावेळी दादा म्हणाले की, शरद चांगला राज्य चालवेल... माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज सांगली मुक्कामी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. 

श्री. शिंदे  म्हणाले,"" वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळातला मी तीन वेळेचा विद्यार्थी आहे. त्यांच्या मोठेपणाची प्रचिती आम्ही वारंवार घेतली. 1983 मध्ये त्यांनी माझ्याकडे अर्थखाते सोपवले. अन्‌ मी सलग नऊ बजेट मांडली. हा त्यावेळचा देशातला उच्चांक होता. वसंतदादा पाटील यांचे विचार गोरगरीब, दलित, अल्पसंख्यांक यांच्या विकासाचे होते. त्यांनी त्यांनी महाराष्ट्राला घडवला. दुष्काळी भागाला पाणी देणे, भाजप ते सारे विसरला आहे. ते कोणाचेही श्रेय घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. सांगलीचे उमेदवार विशाल पाटील यांचे भाषण चांगले झाले. अशाच धाडसी, अभ्यासू खासदारांची दिल्लीत राहुल गांधींना गरज आहे. '' 

loading image