Election Results : सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर

Election Results : सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर

सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत. 

दरम्यान दुसऱ्या फेरीत संजयकाका पाटील (भाजप) यांना 21138 तर विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना)  यांना18335 व गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडी यांना12889 मते मिळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या  मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आज (ता. २३) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. दुपारी चारपर्यंत कल, तर मध्यरात्री बारापर्यंत अंतिम निकाल अपेक्षित आहे. 

महिनाभर उत्सुकता लागून राहिलेल्या सांगलीत कोण जिंकणार, सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील गड राखणार की काँग्रेस-स्वाभिमानी महाआघाडीचे विशाल पाटील गड हिसकावणार की यंदा प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या 
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर विजयश्री खेचणार, याचा फैसला होणार आहे. 

प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ५९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली तरी प्रक्रिया पार पाडण्यासाठी सव्वादोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा राबता राहणार आहे. मतमोजणीसाठीचे अधिकारी-कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षकांचीही सरमिसळ करण्यात आली. मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था आहे.
सांगली लोकसभेतील सहा विधानसभांसाठी १२०, तर पोस्टाची मतांची दहा टेबलांवर मोजणी होणार आहे. ५९२ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.  एका फेरीत विधानसभेच्या सहा मतदारसंघांतील १२० यंत्रांवरील मते मोजली जात आहेत.

विधानसभानिहाय मतदान केंद्राच्या संख्येवर १५ ते १८ फेऱ्यात होतील. सांगली-मिरज रोडवरील शासकीय धान्य गोदामाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे.   

लोकसभेसाठी यंदा चुरशीने ६५.३८ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळेपेक्षा मतदान वाढल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केव्हा एकदा निकाल लागतो आणि अंगाला गुलाल लावतोय, याची  कार्यकर्त्यांत जणू काही शर्यती लागल्या आहे. अनेकांनी निकालाबद्दल पैजा लावल्या आहेत. सर्वांना मतमोजणीची प्रतीक्षा लागली आहे.

मतदान यंत्रे...१८४८ 
विधानसभा, मतदान केंद्र, फेऱ्या, 
सांगली, ३१०, १६ 
मिरज, ३२६, १७ 
तासगाव, कम, २९७, १५ 
खानापूर, ३४८, १८ 
पलूस, कडेगाव, २८४, १५ 
जत, २८३, १५ 

दृष्टिक्षेपात
एकूण मतदार- १८,०३,०५४
झालेले मतदान- ११,७८,८१४
मतदानाची टक्केवारी-६५.३८
ईव्हीएम मशिन-१८४८
फेऱ्या-१८
टेबल १३२
एकूण कर्मचारी ५९२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com