Loksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक 

Loksabha 2019  : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक 

सांगली -  येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक फुटले होते. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते आशावादी वाटत होते. खासदार राजू शेट्टी वसंतदादा कुटुंबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ही जागा कॉंग्रेसला देतील असाही सूर दिसून आला.

दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ( ता. 21) रात्रीच सांगली स्वाभिमानीला सोडल्याचे सांगितले. त्यावर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील अपक्ष लढू शकतात, असा इशाराही काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. 

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा हिस्सा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभा मतदारसंघ मिळाला तर येथे कोण लढू शकेल, याचा शोध गेल्या चार दिवसापासून अद्यापही सुरु आहे. खासदार शेट्टींची टीम त्यासाठी मते आजमावत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर, निवृत्त वरिष्ठ अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्यासह माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील अशा एक नव्हे अनेक नावांची चर्चा आणि कंड्या आज दिवसभर पिकवल्या जात होत्या. 

काँग्रेसकडून आमदार विश्‍वजित कदम यांच्या नकारानंतर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचे नाव पुढे आले. माजी मंत्री प्रतीक पाटील यांनीही शांततेचे धोरण स्विकारले आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कॉंग्रेसलाच येथे उमेदवारी मिळेल अन्‌ ज्यांना पक्ष उमेदवारी देईल, त्यांच्या पाठिंशी सर्व जण ताकदीने उभे राहू, असे जाहिर केले आहे. मात्र उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले आहे. 

सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेच देण्याचा निर्णय गुरुवारी रात्री अंतिम झाला आहे. मात्र कॉंग्रेसमधील काही नाराजांनी अपक्ष लढायची तयारी सुरु केल्याचे आमच्या कानी आले आहे. 
- महेश खराडे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com