बघा.. अशा झुडुपात  राहतात पोलिस ः वाचा कुठे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

इस्लामपूर (सांगली) : कोरोनासह सर्वच आपत्तीच्या कालावधीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या निवाऱ्याची मात्र दुरवस्था आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या दुरावस्थेबाबात जैसे थे परिस्थिती आहे. वाळवा तालुक्‍यातील चारही पोलिस ठाण्यांबाबत हेच चित्र आहे. 24 तास सेवा देणारा पोलीस विभाग ऊन वारा पाऊस याचा विचार न करता सतत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी उभा राहिला आहे. 

इस्लामपूर (सांगली) : कोरोनासह सर्वच आपत्तीच्या कालावधीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या निवाऱ्याची मात्र दुरवस्था आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या दुरावस्थेबाबात जैसे थे परिस्थिती आहे. वाळवा तालुक्‍यातील चारही पोलिस ठाण्यांबाबत हेच चित्र आहे. 
24 तास सेवा देणारा पोलीस विभाग ऊन वारा पाऊस याचा विचार न करता सतत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी उभा राहिला आहे. 

इस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व इस्लामपूर पोलीस ठाणे आहे येथे एकूण 118 कर्मचारी कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांसाठी फक्त 50 घरांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र त्या ठिकाणी 27 घरे वापरात आहेत. बाकीची घरे बंद अवस्थेत आहेत. घरांच्या आसपास मोठमोठी झाडे झुडपे उगवली आहेत. सांडपाण्याची दुरावस्था झाली आहे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 

आष्टा पोलीस ठाण्यात 45 कर्मचारी कार्यरत आहेत.येथे पोलिसांना राहण्यासाठी 24 घरांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु त्याठिकाणी फक्त 7 कर्मचारी राहतात. 17 घरे पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. त्याठिकाणी माणसांना राहण्यास योग्य स्थिती नसल्याने तिथे कोणीही पोलीस कर्मचारी रहात नाही. कुरळप पोलीस ठाण्यात एकूण 35 पोलीस कर्मचारी आहेत. या पोलीस ठाण्या अंतर्गत 21 गावांचा समावेश होतो. आज रोजी तेथील पोलीस कर्मचारी राहण्याची चाळ गेली दहा वर्षे झाली पूर्णपणे पडझड झालेली आहे. 

कासेगाव पोलीस ठाण्याची तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. मुळात कासेगाव पोलीस ठाण्याची स्वतःची इमारत नाही. हे पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत उभे आहे. अशा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था कशी होईल हा मोठा प्रश्नच आहे. त्या ठिकाणी 27 कर्मचारी आहेत.या ठाण्यांतर्गत 10 गावांचा समावेश आहे. 

 

सदर पोलीस ठाण्यामार्फत शासनास पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी चा प्रस्ताव सादर केलेला आहे. तो शासनाच्या विचाराधीन आहे.परंतु सध्या कोरोनामुळे हे काम थांबवण्यात आले आहे. 

पोलीस निरीक्षक - नारायण देशमुख. 
इस्लामपूर पोलीस ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look .. Police live in such bushes: Read where