जिंती रेल्वे स्थानकावर लुटमार; 56 हजारांचा ऐवज लंपास

जिंती रेल्वे स्थानकावर लुटमार; 56 हजारांचा ऐवज लंपास

दौंड (पुणे) : जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला. 

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय चाकणे यांनी आज (ता. ७) याबाबत माहिती दिली. आज पहाटे तीनच्या दरम्यान भुवनेश्वर-पुणे ही सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे क्रॅासिंगसाठी जिंती रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्यादरम्यान सर्वसाधारण डब्यात तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन तरूणांनी अचानक प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना धमकावले.

चोरट्यांनी नागम्मा मलप्पा कोडी (वय ४०, रा. बांदरवड, जि. कलबुर्गी) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेण्यासह त्यांच्याकडील मोबाईल संच व रोख रक्कम काढून घेतली. त्याचबरोबर अशोककुमार शंकर प्रधान (वय २६, रा. काळेवाडी, पिंपरी), श्रीकांत सुभाष गायकवाड ( वय २७, रा. उस्मानाबाद) व रियाज बाबू शेख (वय २१, रा. अनदूर, ता. तूळजापूर) या तीन प्रवाशांकडील एकूण १३ हजार रूपयांची रोकड काढून घेत चोरट्यांनी त्यांच्या बॅगा लांबविल्या. सदर लुटमार सुरू असताना चोरट्यांचे दोन अन्य तरूण साथीदार खाली थांबले होते. 

याबाबत नागम्मा कोडी यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याने पुढील तपासासाठी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.        

टोळीचा संशय

सदर लुटमार प्रवासी रेल्वे लुटणाऱ्या टोळीने केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने विविध शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. पुणे लोहमार्ग दलाचे अधीक्षक दीपक साकोरे, दौंड लोहमार्ग पोलिस दलाचे निरीक्षक अनील दबडे यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com