ऊस तोडीसाठी एकरी चार ते पाच हजारांची लूट सुरुच

विष्णू मोहिते
Monday, 1 March 2021

ऊस तोडकरी मजुरांकडून शेतकऱ्याची लूट सुरुच आहे. एकरी तीन ते चार हजार रुपये तोडणीसाठी मोजावे लागत आहेत.

सांगली : ऊस तोडकरी मजुरांकडून शेतकऱ्याची लूट सुरुच आहे. एकरी तीन ते चार हजार रुपये तोडणीसाठी मोजावे लागत आहेत. उन्हाची तीव्रता वाढेल, तसे मजुरांकडून पैशाची मागणी वाढते आहे. या शिवाय पिण्याचे पाणीही शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे. 

ल्ह्यात यंदा तोडणी मजुरांची संख्या अपुरी आहे. त्यातच ऊस क्षेत्र वाढले आहे. याचाच गैरफायदा मजूर आणि त्यांच्या मुकादम घेताना दिसत आहेत. शेतकऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन तोडणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात आहेत. एकरी तीन ते चार हजार रुपये मोजल्याशिवय ऊस फड तोडणीला कोयताच घातला जात नाही. याशिवाय ट्रॅक्‍टर चालकाची एंट्री वेगळी द्यावी लागते ही वस्तुस्थिती आहे.

आगोदरच कारखानदार शेतकऱ्यांना वजनात लुटत आहेत. त्यात तोडणी मजुराची भरच पडली आहे. कारखानदार ही याबाबतीत काहीच बोलताना दिसत नाहीत. 
गेल्या महिन्यापासून लुटीचा आणखी एक प्रकार समोर येतो आहे. काही मुकादम रोखीने ऊस खरेदी करीत आहेत. तुम्हाला जागेवर पैसे पाहिजेत काय, अशी विचारणा करून रोखीने अडीच हजार रुपये टन भावाने शेतकऱ्यांना पैसे मोजतात आणि तो ऊस आपल्या नावावर गाळपास पाठवला जातो आहे.

कारखान्याकडून संबंधित मुकादमाच्या नावाने 2800 ते तीन हजार रुपये बिल घेतात. हा नवा धंदा बेडग परिसरात सुरू आहे. शेतकरीही तोड लवकर मिळते, कमी पण रोखीने पैसे मिळतात त्यामुळे मुकादमाच्या या नव्या लूट योजनेला हातभार लावत आहेत. 

ऊस फड पेटू लागले... 
कारखान्यांकडून ऊस गाळपास विलंब होत आहे. यामुळे अनेक शेतकरी अनेकांकडून ऊस फड पेटवून तातडीने कारखान्यांना गाळपास पाठवले जात आहेत. यामुळे कारखान्याकडून होणाऱ्या दराचा फटका सहन करावा लागतोय. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looting of four to five thousand per acre for cane harvesting continues