esakal | राष्ट्रवादी आर.आर. आबांच्या मुलाच्या प्रेमात, पत्र व्हायरल

बोलून बातमी शोधा

In love with the Nationalist Ab's son, the letter Viral

एकेकाळी राष्ट्रवादीकडे फर्ड्या वक्त्यांची फौज होती. मात्र, अलिकडच्या काळात ती दिसत नाही. तसेच नवीन नेतृत्व तयार व्हायचे असेल तर संघटन कौशल्य असलेल्या तरूण नेतृत्त्वाची गरज युवक कार्यकर्त्यांना भासू लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात जाणीवपूर्वक काही नेत्यांना स्थान दिले. तरूणांनाही संधी दिली होती.

राष्ट्रवादी आर.आर. आबांच्या मुलाच्या प्रेमात, पत्र व्हायरल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे वाक्ताचातुर्य उभ्या महाराष्ट्राला माहिती होतं. त्यांच्याविषयी विरोधी पक्षातील नेत्यांनाही आपुलकी होती. त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन आमदारकीची संधी दिली आहे. या काळात आबांचे चिरंजीव रोहित यांनी छाप सोडली आहे. वडिलांप्रमाणेच त्यांनी वाक्चातुर्य हा गुण घेतला आहे. संघटन कौशल्यही लाजवाब आहे.

सांगलीमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे चाहते आहेत. त्यांनीही आपल्या पातळीवर तरूणांची फळी उभी केली आहे. 

राष्ट्रवादीची परंपरा

एकेकाळी राष्ट्रवादीकडे फर्ड्या वक्त्यांची फौज होती. मात्र, अलिकडच्या काळात ती दिसत नाही. तसेच नवीन नेतृत्व तयार व्हायचे असेल तर संघटन कौशल्य असलेल्या तरूण नेतृत्त्वाची गरज युवक कार्यकर्त्यांना भासू लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात जाणीवपूर्वक काही नेत्यांना स्थान दिले. तरूणांनाही संधी दिली होती. आबा, जयंत पाटील, वळसे पाटील, धनंजय मुंडे, अलिकडे अमोल मिटकरी, अमोल कोल्हे ही नावे त्यापैकीच. 

यातील बहुतांश मंडळी शासनकर्ते आहेत. त्यामुळे पक्षपातळीवर काम करणारे नेते कमी आहेत. त्यातल्या त्यात युवकांसाठी काम करणाऱ्यांची कमतरता आहे. यातून आबांचे चिरंजीव रोहित यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. अक्षरशः गावोगावचे तरूण रोहितच्या प्रेमात पडले आहेत.

पक्षाच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी मागणी होत आहे. संगमनेरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांच्या या निवडीसाठी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली. त्यांनी शरद पवार यांना दिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या रोहित काय करतो..

गेल्या विधानसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित हाच पुढचा उमेदवार असेल पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्याचा प्रवेश निश्चित मानला जातो. सध्या जरी रोहित हा मुंबईमध्ये कॉलेज शिकत  आहे. रोहितसारख्या तरूणाकडे संघटनेची जबाबदारी दिल्यास पक्षाला फायदाच होईल. आणि महाराष्ट्राला पुन्हा आबांसारखे भाषण आणि काम पाहायला मिळेल, असे त्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियात त्याच्या भाषणाच्या क्लिप कार्यकर्ते फिरवित असतात. त्याच्या नावाने फेसबुकवर फॅन क्लबही आहे.

काय आहे पत्रात

शरद पवार साहेब, नमस्कार.
“पत्र लिहिण्यास कारण की, महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित आर आर पाटील यांची निवड करावी, अशी विनंती आहे. साहेब तुमची लढाई आम्ही पाहत आहोत. तुमच्याच विचारांचे पाईक रोहित आर आर पाटील आहेत. देश संकटात आहे, जनतेचे मूळ प्रश्न मागे राहत आहेत. देशाची भाषाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुण डिप्रेशनमध्ये जात आहेत. असंघटित कामगार, शेतकऱ्यांच्या दुःखात दररोज भर पडत आहे. मराठा समाजापासून तळागाळातील समाजापर्यंत नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत. या वाटा तुकोबांच्या विचाराप्रमाणे प्रकाशमान करण्यासाठी तुमच्या विचारांची आणि त्या विचाराला गती देणार्‍यांची गरज आहे. तुमच्या विचाराला गती रोहित आर आर पाटील देऊ शकतात, असे आम्हाला वाटते. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनंती करत आहोत.”