

LPG Gas
sakal
सांगली : जिल्ह्यात एलपीजी गॅसचा आजचा साठा सुमारे ३२०० टनांपेक्षा अधिक असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. शिवाय, दोन हजार टनांहून अधिक एलपीजी गॅस मार्गस्थ आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मागणीप्रमाणे केला जात असून, कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.