खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा

अकलूज (सोलापूर) : उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना) यांच्यासह हिंमतराव पाटील, रवी पाटील आणि आठ ते 10 अनोळखी व्यक्तींवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सध्या अकलूज ठाण्यात अटकेत असलेल्या सतीश दंडनाईक यांनी तक्रार नोंदविली आहे.


कळंब पंचायत समितीचे सदस्य माळेवाडी बोरगाव येथे हिंमतराव अशोकराव पाटील यांच्या बंगल्यावर आले होते. ते स्वखुशीने आले की जबरदस्तीने आणले गेले, याबाबत खात्री करण्यासाठी गणेश भातलवंडे व चालक पोपट चव्हाण यांच्यासमवेत मी तेथे गेले असता हिंमतराव पाटील, रवी पाटील व आठ ते 10 अनोळखी साथीदार अंगावर धावून आले, तिघांनाही मारहाण केली. या वेळी पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोबाईलवरून आपल्याला पकडले असल्याचे सांगितले. ओमराजे यांनी "त्याला सोडू नको धडा शिकव' असे स्पीकर फोनवर ओरडून सांगितले. त्यानंतर पाटील यांनी सत्तूर डोक्‍यात घातला; परंतु प्रसंगावधान राखून तो चुकविल्याने आपण वाचलो असल्याचे दंडनाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

तालुक्‍यात उलटसुलट चर्चा 
याआधी हिंमतराव पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 11 जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात पोलिसांनी अटक केलेल्या सतीश दंडनाईक यांनी ही तक्रार केली असल्याने तालुक्‍यात उलटसुलट चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com