चिक्कोडी प्रांताधिकारीपदी माधव गीते; संतोष कामगौडा यांची तडकाफडकी बदली

चिक्कोडी उपविभागाचे नवे प्रांताधिकारी म्हणून माधव गीते यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. सध्याचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
Madhav Gite
Madhav GiteSakal
Summary

चिक्कोडी उपविभागाचे नवे प्रांताधिकारी म्हणून माधव गीते यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. सध्याचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

चिक्कोडी - चिक्कोडी उपविभागाचे नवे प्रांताधिकारी म्हणून माधव गीते यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. सध्याचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गीते हे आयएएस अधिकारी असून ते चिक्कोडीत आज रूजू झाले.

माधव गीते हे मुळचे नांदेड (महाराष्ट्र) येथील आहेत. आयएएस होण्यापूर्वी त्यांनी साॅफ्टवेअर इंजिनियर म्हणूनही काम केले आहे. 2020 च्या बॅचमधील ते आयएएस अधिकारी आहेत. प्रारंभी दिल्ली येथे साहाय्यक सचिव म्हणून सेवा केली आहे. त्यानंतर धारवाड येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सेवा केली असून आता त्यांना चिक्कोडीचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे.

जानेवारी 2022 मध्ये संतोष कामगौडा हे चिक्कोडीचे प्रांताधिकारी म्हणून रूजू झाले होते. केएएस अधिकारी असलेल्या कामगौडा यांनी चिक्कोडी विभागात जनतेला चांगली सेवा दिल्याने कमी कालावधीत त्यांनी लोकांची मने जिंकली होती. आज नियमित कामाच्या दौऱ्यात असतानाच त्यांना अचानक बदलीचे आदेश मिळाले.

राज्यात बुधवारी 9 प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या सर्व बदल्यांच्या ठिकाणी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली झालेल्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे आदेश दिलेले नाहीत. संतोष कामगौडा यांना अद्याप त्यांच्या नियुक्तीचे आदेश आलेले नाहीत.

चिक्कोडी उपविभागातील विकासासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक गावापर्यंतच्या समस्या दूर करण्याचा मानस आहे. लोकांच्यात राहून सेवा करण्याचा प्रयत्न आहे. या भागातील लोक माझ्यापर्यंत थेट कामे घेऊन यावे. जे लोकांसाठी चांगले व कायदेशीर आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्यास कटीबद्ध आहे.

- माधव गीते, नूतन प्रांताधिकारी, चिक्कोडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com