Sangli Accident : आलिशान मोटारीने दुचाकींना उडवले; चार ते पाच जण जखमी; माधवनगर-खोतवाडीत घटना

Sangli News : तीन गावांच्या लोकांनी पाठलाग करून त्याला खोतवाडी येथे गाठले. शेतात त्याची चारचाकी अडवून धरली. शेकडोने असणाऱ्या नागरिकांच्या जमावाला पोलिसांनी तत्काळ पांगवत चालकाला ताब्यात घेतले.
The aftermath of a luxury car accident in Madhavnagar-Khotwadi, where several motorbikes were hit, leaving multiple people injured.
The aftermath of a luxury car accident in Madhavnagar-Khotwadi, where several motorbikes were hit, leaving multiple people injured.Sakal
Updated on

सांगली : माधवनगर ते खोतवाडी (ता. मिरज) या मार्गावर रात्री दहाच्या सुमारास अालिशान चारचाकी चालकाने ‘हिट ॲन्ड रन’ करत थरकाप उडवला. तीन गावांतील सात ते आठ दुचाकींना उडवत भरधाव वेगाने पळ काढला. तीन गावांच्या लोकांनी पाठलाग करून त्याला खोतवाडी येथे गाठले. शेतात त्याची चारचाकी अडवून धरली. शेकडोने असणाऱ्या नागरिकांच्या जमावाला पोलिसांनी तत्काळ पांगवत चालकाला ताब्यात घेतले. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील तो चालक असल्याचे समजते. दरम्यान, चार ते पाच जण जखमी झाले असून, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com