
पंढरपूर : माघी यात्रे दरम्यान चंद्रभागा नदी स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन तृप्त झालेले भाविक जड अंतकरणाने रविवारी (ता.९) परतीच्या प्रवासाला निघाले होते. 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता' अशी भावना व्यक्त करीत लाखो भाविकांनी येथील चंद्रभागा बस स्थानकावर गर्दी केली होती.