Sangli Over Dues : तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ‘महावितरण’ची कारवाई , सांगली जिल्ह्यात २६ कोटींची थकबाकी
Power Disconnection : सांगली जिल्ह्यात थकीत वीजबिलांमुळे मोठी कारवाई सुरू झाली असून तब्बल तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणाकडे २६ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
सांगली : ‘जिल्ह्यात २ लाख ४ हजार ८५५ ग्राहकांकडे ‘महावितरण’ची २६ कोटी तीन लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे.