Sangli Election : महाविकास आघाडीच्या पटावर रोज नवा डाव; शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय खलबते
Maha Vikas Aghadi Strategy : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या चर्चांना रोज नवे वळण मिळत असून शेवटच्या क्षणापर्यंत खलबते सुरू आहेत
सांगली : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल, असेच चित्र प्रारंभी होते. भाजप पक्षात प्रचंड गर्दी वाढल्यानंतर त्यांनी स्वबळाचा नारा दिला. राष्ट्रवादी (अजित पवार) मोकळी राहिली.