संशयित तिघांनी महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ इतर चॅनेलनाही विकले होते. ते चढ्या दराने व्हिडिओ विकण्याचा व्यवसाय चालवत होते, हे तपासात समोर आले आहे.
सांगली/शिराळा : प्रयागराजमधील एका यूट्यूबरने महाकुंभात (Mahakumbh Mela) महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ बनवत यूट्यूब चॅनेलवर (YouTube Channel) अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने (Ahmedabad Crime Branch) याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये चिखली (ता. शिराळा) येथील प्रांज राजेंद्र पाटील (२०) याचा समावेश आहे.