-संतोष कणसे
कडेगाव : पलूस-कडेगाव मतदारसंघात २ लाख ३४ हजार ६७ मतदान झाले. त्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे विश्वजित कदम यांना १ लाख ३० हजार ७६९, तर भाजप महायुतीचे संग्राम देशमुख यांना १ लाख ७०५ मते मिळाली. विश्वजित कदम यांनी ३० हजार ६४ मतांनी विजय संपादन केला. मतदारसंघातील ९१ पैकी ७६ गावांमध्ये विश्वजित कदम, तर १५ गावामध्ये संग्राम देशमुख यांना आघाडी मिळाली.