निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी आहे. राज्यावर आर्थिक संकट आले तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही.
सांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana) सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्यवेळी घेणार, असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले आहे. आता यासोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे धोरण राबवावे लागणार आहे. कारण महिलांना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसे न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो.