बहे : महिलांना शेती-मालमत्तेत सहहक्क मिळावा यासाठी राज्य शासनाने (Maharashtra Government) सुरू केलेली ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ (Laxmi Mukti Yojana) प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पती स्वतःच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवू शकतो.