एक हात नसणाऱ्या विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पटेल यांच्यात चटकदार कुस्ती झाली. त्यांच्यात दिव्यांग विराज पाटील घिस्सा डावावर चौथ्या मिनिटात विजयी झाला.
कुंडल : येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात (Maharashtra Wrestling) प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या गौरव मच्छवाडा याने जिंकली. ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मच्छवाडा (पंजाब) अशी कुस्ती झाली. गौरव मच्छवाडाने (Gaurav Machhwada) ११ व्या मिनिटाला हर्षल सदगीरला हफ्ता डावावर चितपट केले.