दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांना बेळगावबंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी सदर मंत्र्यांना 24 मे ते 27 मे रात्री आठपर्यंत बेळगाव शहरात येण्यास बंदी घातल्याची नोटीस बजावली आहे. यासाठी मोठा पोलिस फौजफाटा उभा करुन कोल्हापुरहुन येणारी सर्व वाहने अडवुन ठेवण्यात आली होती

बेळगाव - मराठी कागदपत्रांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी उपस्थित राहण्यास बेळगावात येणाऱ्या महाराष्ट्राचे मंत्री दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांना जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कोगनोळी नाक्‍यावरच रोखले आहे.

बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी सदर मंत्र्यांना 24 मे ते 27 मे रात्री आठपर्यंत बेळगाव शहरात येण्यास बंदी घातल्याची नोटीस बजावली आहे. यासाठी मोठा पोलिस फौजफाटा उभा करुन कोल्हापुरहुन येणारी सर्व वाहने अडवुन ठेवण्यात आली होती. यावेळी सदर मंत्र्यांसोबत आलेले कोल्हापुरचे आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, संजय पवार, हर्षद कदम या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सुमारे 40. 50 वाहनांना नाक्‍यावरुन परतावे लागले

Web Title: Maharashtra Minister stopped while entering in Belgaum