Jayant Patil Supports Rohit Pawar’s Allegations in Ajit Pawar Plane Crash Case
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवारांच्या शंका रास्त; जयंत पाटलांनी केली 'ही' मागणी, NCP विलीनीकरणावरही भाष्य
Ajit Pawar Plane Crash Controversy Explained : सांगलीत पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यू संदर्भातील शंकांना पाठिंबा देत सखोल व पारदर्शक चौकशीची मागणी केली.
सांगली : ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यूबाबत (Ajit Pawar Plane Crash Case) आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका रास्त आहेत. त्यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला (Jayant Patil Supports Rohit Pawar) आहे. या घटनेची सखोल व पारदर्शी चौकशी झाली पाहिजे,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केले.
