Sangli Art Exhibition : तब्बल १२७५ कलाकृती तुमची वाट पाहताहेत;आजपासून राज्य कला प्रदर्शन, वेळ काढा, भेट द्या, अद्‍भुत कलाविश्वाची सफर करा

1275 Artworks : सांगलीकरांसाठी कलेचा एक अनोखा उत्सव साकारला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुन्हा एकदा सांगलीत भरत असून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या १२७५ निवडक कलाकृतींची मेजवानी येथे अनुभवता येणार आहे.
1275 artworks displayed insangli after 22 years 

1275 artworks displayed insangli after 22 years 

sakal

Updated on

सांगली : तुम्ही कितीही बिझी असाल, टेन्शन असेल, काम असेल तरीही पुढील सात दिवसांत एखादा दिवस दोन तास वेळ काढा. थेट शांतिनिकेतन लोकविद्यापीठ गाठा. तिथे राज्यभरातील कला विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तब्बल १२७५ कलाकृती तुमची वाट पाहत आहेत. हे अद्‍भुत कलाविश्व तुम्हाला साद घालते आहे. २२ वर्षांनंतर सांगलीत भरलेल्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. १६ ते २२ फेब्रुवारी या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन भरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com