जत : भाजपला धक्का, सावंतांचा झेंडा | Election Results 2019

Vikram Sawant vs Vilasrao Jagtap
Vikram Sawant vs Vilasrao Jagtap

जत - जत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून दिले. या मतदारसंघात गेली पंधरा वर्षे भापजची सत्ता होती. ती आता कॉंग्रेसच्या निमित्ताने संपुष्टात निघाली आहे.

विक्रमसिंह सावंत यांना या निवडणुकीत 87 हजार 184 मते मिळाली तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली. तिसऱ्या आघाडीच्या डॉ. रवींद्र आरळी यांना 28 हजार 715 मिळाली. यात सावंत 34 हजार 674 इतक्‍या मोठ्या फरकाने विजयी झाले. जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का माणला जात आहे. 

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. तहसील कार्यालयाच्या समोरील धान्य गोदामामध्ये ही मतमोजणी होती. या निवडणुकीत आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. पहिल्या फेरीला सावंत यांना एक हजार 333 मतांची आघाडी मिळाली तेथून विक्रमसिंह सावंत सतत थोड्या फार फरकाने कायम आघाडीवर राहिले.

एकूण ऐकवीस फेरीत त्यांनी आघाडी घेतली. ही आघाडी जगताप यांना शेवटपर्यंत तोडता आली नाही. लोकांनी जणू एकतर्फी निकाल दिल्याचे दिसून आले. तर स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. रवींद्र आरळी आणि आ. विलासराव जगताप यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक पाच हजार 959 इतकी मते सावंत यांना पडली आहेत. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला, असेही म्हणता येत नाही. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत आमदार विलासराव जगताप 17 हजार मतांनी निवडून आले होते. विक्रम सावंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सावंत यांना निवडणुकीत पराभूत सहन करावा लागला होता तरी त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला. 

मतमोजणीच्या 21 फेऱ्या झाल्या. या फेरीनुसार झालेले मतदान असे :

पहिल्या फेरी- विक्रम सावंत 3819, आ. विलासराव जगताप 2486, डॉ.रवींद्र आरळी 1326.

दुसरी फेरी-सावंत-4163, जगताप 2227, डॉ. 2184.

तिसरी फेरी- सावंत 4513, जगताप 1910, डॉ. 1847.

चौथी फेरी- सावंत 4652, जगताप 2331, डॉ. आरळी 1057.

पाचवी फेरी- सावंत 4625, जगताप 3271, डॉ. आरळी 694.

सहावी फेरी- सावंत 4308, जगताप 2167, डॉ. आरळी 2000.

सातवी फेरी-सावंत 4244,जगताप 2602, डॉ.आरळी 1557.

आठवी फेरी-4062, जगताप 3214,डॉ. आरळी 768.

नववी फेरी- 4833,जगताप 2472, डॉ. आरळी 1771.

दहावी फेरी- सावंत 5743, जगताप 2237, डॉ. आरळी 1305.

अकरावी फेरी-सावंत 4112, जगताप 1961, डॉ. आरळी 1899.

बारावी फेरी- सावंत 3259, जगताप 2201, डॉ. आरळी 2203.

तेरावी फेरी- सावंत 3264, जगताप 3184, डॉ. आरळी 1449.

चौदावी फेरी- सावंत 4023, जगताप 2967,डॉ. आरळी 1458.

पंधरावी फेरी- सावंत 3815, जगताप 1990, डॉ.आरळी 1445.

सोळावी फेरी- सावंत 4326, जगताप 2625, डॉ.आरळी 598.

सतरावी फेरी- सावंत 4290, जगताप 2482,डॉ. आरळी.

आठरावी फेरी- 4695, जगताप 3003, डॉ. आरळी 1981.

एकोणीसावी फेरी- सावंत 4854,जगताप 3009,डॉ. आरळी 1270.

विसावी फेरी- सावंत 4360, जगताप 3011, डॉ. आरळी 1088.

एकविसावी फेरी- सावंत 453, जगताप 684, डॉ. आरळी 27.

टपाली मतदान- सावंत 771, जगताप 476,डॉ. आरळी 203. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com