राधानगरी : चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विजयी | Election Results 2019

Prakash Abitkar Vs K P Patil
Prakash Abitkar Vs K P Patil

गारगोटी - राधानगरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी 18 हजार 430 इतकी मते मिळवून विजय संपादन केला. तर के. पी. पाटील यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदार संघात 12 उमेदवार रिंगणात उभे राहिल्यामुळे कमालीची चुरस निर्माण झाली होती. मात्र जनतेने आमदार आबिटकरांना स्विकारले तर अपक्षांना चांगलेच फटकारल्याचे स्पष्ट झाले. तर उमेदवारांच्या जादा संख्येने मतदारसंघात परिवर्तन होईल हा अनेकांचा अंदाज चुकीचा ठरला. 

येथील मौनी विद्यापीठ क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम व मिना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टेबलावर 22 फेरीत मतमोजणी झाली.

टपाली मतांमध्ये आबिटकरांची बाजी

टपाली मतामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांनी बाजी त्यांना 1 हजार 36 इतकी मते मारली. तर के. पी. पाटील यांना 885 इतकी टपाली मते मिळाली. आमदार आबिटकर यांना एकूण त्यांना 1 लाख 5 हजार 881 इतकी मिळाली. तर के. पी. पाटील यांना 87 हजार 451 इतकी मते मिळाली. निकालानंतर आमदार आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. पहिल्या फेरीपासून त्यांचे मताधिक्य वाढेल तसे कार्यकर्त्यांनी आमदार आबिटकर यांच्या निवासस्थानी व मतमोजणीच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. 

इतर प्रमुख उमेदवार व त्यांची मते कंसात : अरूणकुमार डोंगळे (15336), युवराज येडूरे (950), विजय शिंदे (277), जीवन पाटील (7762), प्रकाश कोरगावकर (165), कृष्णात देसाई (233), चंद्रकांत पाटील (8029), दिनकरराव चांदम (219), राहूल देसाई (12901), सत्यजित जाधव (5952). तर नोटा 1644 असे मतदान झाले .

पहिल्या फेरीपासूनच आमदार आमदार प्रकाश आबिटकर यांचे मताधिक्य वाढत होते. पहिल्या फेरीत आबिटकर यांना 4933 तर पाटील यांना 2414 मते मिळाली. या फेरीत 2519 इतके मताधिक्य मिळाले. दुसऱ्या फेरीत आबिटकर यांना 5103 तर पाटील यांना 3412 मते मिळाली. या फेरीत 1601 इतके मताधिक्य मिळाले. तिसऱ्या फेरीत आबिटकर यांना 5188 तर पाटील यांना 5108 मते मिळाली. या फेरीत 80 इतके मताधिक्य मिळाले. चौथ्या फेरीत आबिटकर यांना 4077 तर पाटील यांना 2947 मते मिळाली. या फेरीत 1130 इतके मताधिक्य मिळाले. पाचव्या फेरीत आबिटकर यांना 5931 तर पाटील यांना 5369 मते मिळाली. या फेरीत 562 इतके मताधिक्य मिळाले. सहाव्या फेरीत आबिटकर यांना 4740 तर पाटील यांना 4142 मते मिळाली. या फेरीत 598 इतके मताधिक्य मिळाले.

सातव्या फेरीत आबिटकर यांना 4658 तर पाटील यांना 5157 मते मिळाली. या फेरीत 499 मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले. आठव्या फेरीत आबिटकर यांना 5432 तर पाटील यांना 5270 मते मिळाली. या फेरीत 162 इतके मताधिक्य मिळाले. नवव्या फेरीत आबिटकर यांना 5409 तर पाटील यांना 5281 मते मिळाली. या फेरीत 128 इतके मताधिक्य मिळाले. दहाव्या फेरीत आबिटकर यांना 6318 तर पाटील यांना 6947 मते मिळाली. या फेरीत 629 मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले. अकराव्या फेरीत आबिटकर यांना 4374 तर पाटील यांना 4472 मते मिळाली. या फेरीत 98 मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले.

बाराव्या फेरीत आबिटकर यांना 5028 तर पाटील यांना 4306 मते मिळाली. या फेरीत 822 इतके मताधिक्य मिळाले. तेराव्या फेरीत आबिटकर यांना 6621 तर पाटील यांना 5220 मते मिळाली. या फेरीत 1401 इतके मताधिक्य मिळाले. चौदाव्या फेरीत आबिटकर यांना 4456 तर पाटील यांना 3138 मते मिळाली. या फेरीत 1318 इतके मताधिक्य मिळाले.

पंधराव्या फेरीत आबिटकर यांना 3513 तर पाटील यांना 2648 मते मिळाली. या फेरीत 865 इतके मताधिक्य मिळाले. सोळाव्या फेरीत आबिटकर यांना 5415 तर पाटील यांना 4035 मते मिळाली. या फेरीत 1080 इतके मताधिक्य मिळाले. सतराव्या फेरीत आबिटकर यांना 5219 तर पाटील यांना 3171 मते मिळाली. या फेरीत 2048 इतके मताधिक्य मिळाले.

अठराव्या फेरीत आबिटकर यांना 3851 तर पाटील यांना 2997 मते मिळाली. या फेरीत 854 इतके मताधिक्य मिळाले. १९ व्या फेरीत आबिटकर यांना 4476 तर पाटील यांना 3287 मते मिळाली. या फेरीत 1189 इतके मताधिक्य मिळाले. विसाव्या फेरीत आबिटकर यांना 4802 तर पाटील यांना 2794 मते मिळाली. या फेरीत 2008 इतके मताधिक्य मिळाले. 21 व्या फेरीत आबिटकर यांना 4586 तर पाटील यांना 4296 इतकी मते मिळाली. या फेरीत 581 इतके मताधिक्य मिळाले. बाविसाव्या फेरीत आबिटकर यांना 816 तर पाटील यांना 255 मते मिळाली. या फेरीत 581 इतके मताधिक्य मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com