करमाळा : शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नारायण पाटील आघाडीवर : Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे, माळशिरसचे उत्तमराव जानकर, मोहोळचे यशवंत माने, पंढरपूरचे भारत भालके आघाडीवर आहेत. 

सोलापूर : करमाळ्यातून शिवासेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांना मागे टाकत बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील हे पाचव्या फेरीत आघाडीवर आले आहेत. तर बार्शीतही राजेंद्र राऊत आघाडीर आले आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर आहेत. 

माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे, माळशिरसचे उत्तमराव जानकर, मोहोळचे यशवंत माने, पंढरपूरचे भारत भालके आघाडीवर आहेत. भाजपचे सोलापूर उत्तर मधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दक्षिणमधून सहकारमंत्री सुभाष देशमुख व अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी आघाडीवर आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतरे झाल्यामुळे नेमक कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली होती. निकाल जसा जवळ येईल तसी उत्कठता लागली होती. गुरुवारी (ता. 24) सकाळपासून मतदान मोजणी सुरु झाल्यानंतर सुरुवातीपासून जिल्ह्यात कोण निवडून येईल हे पाहण्यासाठी कार्यकर्ते मतदान मोजकीडे वळाली. 

चौथ्या फेरीत फारुक शाब्दी 11780 मताने आघाडीवर आहेत. भाजपचे विजयकुमार देशमुख चौथ्या फेरीत 20000 मताने आघाडीवर आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख 4000 मताने आघाडीवर. बार्शीत सोपल 1800 मताने आघाडीवर. नवव्या फेरीत बबनराव शिंदे 26000 मताने आघाडीवर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Karmala trends morning