राष्ट्रवादीच्या सत्यजीतसिंहांनी मैदान साेडताना सेनेच्या शंभूराजांचे केले अभिनंदन I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील आघाडीवर.

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांचा सुमारे चौदा हजार मताधिक्‍याने विजयी निश्चित झाला आहे.

मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या समवेत उमेदवार आमदार देसाई व प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर दोघे शेजारी बसले होते. मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदार देसाई यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले व मतमोजणी कक्षातून निघून जाणे पसंत केले.

दरम्यान कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी 48 हजार 844 मताधिक्य घेतले आहे. भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे सुमारे 51 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर महायुतीचे धैर्यशील कदम सुमारे 39 हजार मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अद्याप या मतदारसंघातील काही मतांची माेजणी राहिली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends middle phase