Vidhan Sabha 2019 : भाजपचे उमेदवार निवडून आणणार - उदयनराजे

सातारा - भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले.
सातारा - भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले.

विधानसभा 2019 : सातारा - जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेसाठी जिल्ह्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही दिली.

भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार व उदयनराजे समर्थकांची एकत्रित बैठक साताऱ्यात आज झाली. त्या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दिलीप येळगावकर, महेश शिंदे, दत्ताजी थोरात, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, सुनील काटकर, विक्रमबाबा पाटणकर, रंजना रावत, सिद्धी पवार, विजय काटवटे, विकास गोसावी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पक्षात माझे मित्र असले, तरी मैत्री ही मैत्रीपुरतीच राहील. आता निवडणूक जाहीर झाल्याने अफवांचा सुळसुळाट होत आहे. आज जे माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबतच राहतील. जे राहणार नाहीत ते नाहीत. भाजपचे जेवढे आमदारकीचे उमेदवार आहेत. शंभूराज देसाई, अतुल भोसले, मनोज घोरपडे, महेश शिंदे, आमचे लाडके बंधू शिवेंद्रसिंहराजे असतील. या सगळ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन. कोणाला निवडून द्यायचे, हे तुमच्या हातात आहे.  मी अजून अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची काळजी घेणारा एखादा असेल तर माझी माघार असेल. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करण्यास तयार आहे.’’ 

दोन्ही राजे मंगळवारी अर्ज भरणार
भाजपच्या वतीने येत्या मंगळवारी (ता. १) उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यासाठी सातारा शहरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com