Vidhan Sabha 2019 : माझी शिकार करून दाखवा - रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

‘काही लोक माझी शिकार करायला निघाले होते. मात्र, हे शिकार करण्याचे दिवस नाहीत. आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत. हिंमत असेल माझी शिकार करून दाखवा,’’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांनी आज विरोधकांना दिले.

विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड - ‘काही लोक माझी शिकार करायला निघाले होते. मात्र, हे शिकार करण्याचे दिवस नाहीत. आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत. हिंमत असेल माझी शिकार करून दाखवा,’’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांनी आज विरोधकांना दिले.

पवार यांनी आज कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘विरोधक म्हणतात, ‘रोहित पवार आमदार होणार; मात्र पुन्हा दिसणार नाही.’ या निमित्ताने, मी आमदार होणार, हे तर विरोधकही मान्य करतात. तुम्ही मंत्री झाल्यावर या भूमीत किती वेळा आलात, हा आमचा सवाल आहे. येथील जनतेला परिवर्तन हवे आहे.’’ मतदारसंघात दारू वाटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष भास्कर भैलुमे, हळगावचे सरपंच संजय ढवळे, उपसरपंच अशोक रंधवे यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhansSabha 2019 Rohit Pawar NCP Politics