महाराष्ट्रात "राजस्थान'सारखी परिस्थिती होणार नाही 

विष्णू मोहिते 
Thursday, 16 July 2020

महाराष्ट्रात राजस्थान होणार नाही, असे ट्विट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

सांगली : महाराष्ट्रात राजस्थान होणार नाही, असे ट्विट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. राजस्थानमधील कॉंग्रेस अंतर्गत घडामोडीच्या पार्श्‍वभूमिवर पालकमंत्री पाटील यांनी ट्विट केले आहे. राज्यातील कॉंग्रेसवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी विश्‍वास व्यक्त केला आहे. 

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेलहोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद सुरु झाला आहे. त्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्या ट्विट केले आहे. त्यावर राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बाजूने आणि सावध भूमिकाही व्यक्त केल्या आहेत. 

पाटील यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रात आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यासून ते सत्ता स्थापन होण्यासाठी शिवसेनेला कॉंग्रेसकडून पाठिंबा देण्यापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर खातेवाटप, विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसकडून एक जादा भरलेला अर्ज आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर माघारीची दिलेली धमकी आणि सध्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडून विश्‍वासात न घेता सुरु असलेल्या कारभाराच्या तक्रारी सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली हे सर्वांनाच ज्ञात आहे. 

त्यांनी म्हटले आहे, की राजस्थानात कॉंग्रेस सत्तेत आहे. त्या ठिकाणी पक्षांतर्गत घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरव्दारे व्यक्त करुन एकप्रकारे कॉंग्रेसवर विश्‍वास दाखवल्याचे मानले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra will not have a situation like "Rajasthan"