
सांगली : ‘महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या चळवळींना सहकाराचे अधिष्ठान आहे. मग ते राजकारण असो व्यवसाय असो वा आध्यात्मिक. म्हणून महाराष्ट्र धर्मात सहकार चळवळ मोडते. सहकार ही जीवन निष्ठा आहे,’’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.