-रवींद्र माने
तासगाव : राज्यात आणि जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये सुरू असलेली महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना तासगाव तालुक्यातील एकाही रुग्णालयामध्ये राबविली जात नसल्याने दरमहा शेकडो रुग्णांना अन्य तालुक्यांत उपचारांसाठी जावे लागत आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने तासगाव मात्र या योजनेतून वगळले जात असल्याचे चित्र आहे.