गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे.
सांगली : नूतन वर्षांची भेट म्हणून गो-ग्रीन सेवेचा (Go-Green Service) पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा ‘महावितरण’ने (Mahavitaran) केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे.