सांगली : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला (Solar Agricultural Pump Scheme) शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. ‘महावितरण’तर्फे (Mahavitaran) सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे.