मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
सांगली : राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त (Solar Agricultural Pump Scheme) ५२ हजार ७०५ सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट ‘महावितरण’ने ६० दिवसांत पूर्ण केले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ११४० शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. उर्वरित अर्जदारांची कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Farmers) शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करता येणार आहे.