
सांगली : ‘विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख पाच हजार ८९२ ग्राहकांकडे २२.९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा, वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी,’ असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.