esakal | यामुळे नंदीध्वज ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू 
sakal

बोलून बातमी शोधा

Siddheshwar yatra

श्री. गणेचारी हे गेल्या 70 वर्षांपासून खेळणं तयार करण्याचे काम करतात. सध्या शिवानंद गणेचारी यांची ही दुसरी पिढी आहे. यात्रेतील नंदीध्वजाचे खेळणं तयार करण्यासाठी 70 वर्षांपूर्वी चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली. या निवडीत खेळणं तयार करण्याचा मान राजाराम भागवत व मल्लिनाथ गणेचारी यांना मिळाला.

यामुळे नंदीध्वज ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू 

sakal_logo
By
प्रशांत देशपांडे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख आकर्षण असतात ते मानाचे सात नंदीध्वज. या सातही नंदीध्वजांच्या वरील बाजूच्या सजावटीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हे खेळणं कागद, काठ्यांपासून तयार करण्यात येते. एक खेळणं बनविण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. दरम्यान, यात्रेतील मानाच्या पहिल्या, दुसऱ्या, सहाव्या व सातव्या नंदीध्वजावरील खेळणं तयार करण्याचे काम आम्ही करतो, असे शिवानंद गणेचारी यांनी सांगितले. 

हेही वाचा अवर्जुन : बी ईच्या विद्यार्थ्याचा शिपाई पदासाठी अर्ज 

खेळणं तयार करण्याचे काम
श्री. गणेचारी हे गेल्या 70 वर्षांपासून खेळणं तयार करण्याचे काम करतात. सध्या शिवानंद गणेचारी यांची ही दुसरी पिढी आहे. यात्रेतील नंदीध्वजाचे खेळणं तयार करण्यासाठी 70 वर्षांपूर्वी चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली. या निवडीत खेळणं तयार करण्याचा मान राजाराम भागवत व मल्लिनाथ गणेचारी यांना मिळाला. नंदीध्वजाचे खेळणं हे विविध प्रकारचे स्टीकर, गोल कलरमा 
कागद, चमकी, कामटी, रेडियम यापासून तयार करण्यात येते, असे श्री. गणेचारी यांनी सांगितले. प्रथम नंदीध्वजाचे खेळणं तयार करण्याचा मान (कै.) मल्लिकार्जुन गणेचारी स्वामी यांना मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत पंचाक्षरी गणेचारी, शिवानंद गणेचारी, सचिन गणेचारी, विनायक गणेचारी या परिवारातील सदस्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या एक महिन्यापासून नंदीध्वजाचे खेळणं तयार करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. काही कामगारांची देखील खेळणं तयार करण्याच्या कामात मदत घेतली जाते. 
हेही वाचा - आईवडिलांकडे जाण्याऐवजी तिने कवटाळले मृत्युला 

कर्नाटकातून मागणी वाढली
वर्षभरात 400 पेक्षा जास्त खेळण्यातील नंदीध्वज तयार करण्यात येतात. पूर्वी खेळण्यातील नंदीध्वज फक्त सिद्धेश्‍वर यात्रेच्या काळात दिसत. मात्र, अलीकडच्या काळात नंदीध्वजाच्या खेळण्यास सोलापूरजवळील ग्रामीण भागातून तसेच कर्नाटकातून मागणी वाढली आहे. यामध्ये मंद्रूप, हत्तूर, वागदरी, यांसह कर्नाटकातील विजयपूर येथूनही मागणी असते.  

 
 

loading image